Home अकोले रिमझिम पावसाने स्‍वेटरसोबत छत्रीही सोबतीला; अकोलेत अवकाळी

रिमझिम पावसाने स्‍वेटरसोबत छत्रीही सोबतीला; अकोलेत अवकाळी

umbrella with a sweater in the pouring rain in Akole

अकोले | Rain Alert: अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. अकोले तालुक्यात देखील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे ऐन हिवाळ्यात रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे स्वेटर, टोपी बरोबरच नागरिकांना छत्री घेऊन बाहेर पडावे लागत आहे.

हवामान विभागातर्फे जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार सकाळपासूनच अकोलेत ढगाळ वातावरण होते. परंतु, सकाळपासूनच अकोले तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर जिल्ह्यातील संगमनेर, राहता येथे देखील तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. तर अकोले तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे बघायला मिळाले आहे.

आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण व दुपारनंतर झालेल्या पावसामुळे हवेत आणखीनच गारवा निर्माण झाला असून नागरिकांना ऐन हिवाळ्यात स्वेटर, टोपी बरोबरच छत्री देखील घेऊन बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: umbrella with a sweater in the pouring rain in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here