Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाट शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाट शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक

Sangamner Nasik pune Highway Bike driver Accident

संगमनेर | Accident: नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाट शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

साबुजी धोंडीभाऊ बिचकुले वय ५८ रा. चिंचेवाडी साकुर ता. संगमनेर असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.

अपघाताची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोकरे, पोलीस नाईक पुजारी, गांजवे मंडलिक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमीस संगमनेरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर दुचाकीस्वराच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. याअपघात दुचाकीस्वार जखमी झाल्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल ढोकरे यांनी सांगितले. संगमनेर तालुका पोलिसांनी या अपघाताच्या घटनेचा तपास सुरु केला असल्याचे सांगण्यात आले आहे.   

Web Title: Sangamner Nasik pune Highway Bike driver Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here