Home अहमदनगर अहमदनगर: धक्कादायक! सात वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर: धक्कादायक! सात वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार

Ahmednagar News: सात वर्षीय बालिकेला पाणीपुरी, चॉकलेटचे आमिष दाखवून अनैसर्गिक अत्याचार (abuse) केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात.

Unnatural abuse of seven-year-old girl

अहमदनगर: अंगणात खेळत असणाऱ्या सात वर्षीय बालिकेला पाणीपुरी, चॉकलेटचे आमिष दाखवून अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे.  

याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युसूफ हमीद कुरेशी (वय 34 सध्या रा. काटवन खंडोबा, नगर, मुळ रा. लासुरणे ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसूफ कुरेशीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादी हे  मोलमजुरीचे काम करतात. त्यांची अल्पवयीन मुलगी शाळेत जाते. त्या मुलीला तीन ते चार दिवसांपासून युसूफ कुरेशी हा पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स देत होता. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने फिर्यादी यांची मुलगी घरीच होती. फिर्यादी कामावर गेल्यानंतर युसूफ कुरेशी याने मुलीला दुचाकीवरून बसून तो कामाला असलेल्या एका मंगलकार्यालयात नेले. त्या ठिकाणी युसूफने मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य (abuse) केले. याची माहिती मुलीच्या आईला समजतात त्यांनी इतर नातेवाईकांशी संपर्क केला. त्यांनी चाईल्ड लाईन संस्थेला माहिती दिली.

चाईल्ड लाईनमधील अधिकार्‍यांच्या मदतीने पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच युसूफ कुरेशी नगर शहरातून पसार होण्याच्या पूर्वीच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने त्याला अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, सागर पालवे, दीपक रोहकले, सुजय हिवाळे, अमोल गाढे, संदीप थारोत, सोमनाथ राऊत, तान्हाजी पवार, याकुब सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान सदर घटनेसंदर्भात नाशिक येथील प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात सखोल तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Web Title: Unnatural abuse of seven-year-old girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here