Home नाशिक फ्रीजरला पाय लागून शॉक बसून चिमुकलीचा मृत्यू

फ्रीजरला पाय लागून शॉक बसून चिमुकलीचा मृत्यू

Nashik Accident:  आइस्क्रीम घेत असतानाच दुकानातील फ्रीजजवळ पाय गेल्याने, त्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेल्या केबलचा धक्का मुलीला लागल्याने मृत्यू (Death).

freezer Shock minor girl Death

नाशिक : वडिलांबरोबर आइस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा दुकानातील फ्रीजरला पाय लागून शॉक लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

जगतापनगर येथील विशाल अनिल कुलकर्णी हे गुरुवारी रात्री त्यांची चार वर्षीय मुलगी ग्रीष्मा हिला घराजवळील मेडिकल स्टोअरमध्ये आइस्क्रीम घेण्यासाठी गेले होते.

आइस्क्रीम घेत असतानाच ग्रीष्माचा दुकानातील फ्रीजजवळ पाय गेल्याने, त्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असलेल्या केबलचा धक्का तिला लागला. ग्रीष्मा खाली कोसळली. विशाल यांनी तत्काळ तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Web Title: freezer Shock minor girl Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here