Home अमरावती दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ पण केला व्हायरल

दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ पण केला व्हायरल

Friend Abused:  मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना. अत्याचाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले तर दुसऱ्याने ते व्हॉट्सॲपवर शेअर केले, दोघांवर गुन्हा.

Unnatural abused of a friend by drinking alcohol

अमरावती: येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी परिसरात घडली आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या आणखी एक व्यक्तीने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे व्हिडिओ शूट केले. इतकेच नाही तर तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

एकाने अत्याचाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले तर दुसऱ्याने ते व्हॉट्सॲपवर शेअर केले अन् पाहता पाहता शेकडो लोकांकडे तो व्हिडिओ फॉरवर्ड झाला. बलात्काराच्या अनेक घटना होत असताना मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.

Web Title: Unnatural abused of a friend by drinking alcohol

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here