Home Accident News समृद्धी महामार्गावर गॅसच्या टाक्या घेऊन जात असलेला ट्रक पलटी

समृद्धी महामार्गावर गॅसच्या टाक्या घेऊन जात असलेला ट्रक पलटी

Ahmednagar Accident:  ट्रकला काळवीट आडवे आल्याने सुरक्षा कठडे तोडून ट्रक थेट महामार्गावरून खाली पडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी.

Accident A truck carrying gas tanks overturned on Samriddhi Highway

अहमदनगर : समृद्धी महामार्गावरून एचपी कंपनीच्या गॅसच्या टाक्या घेऊन जात असलेल्या ट्रकला काळवीट आडवे आल्याने सुरक्षा कठडे तोडून ट्रक थेट महामार्गावरून खाली पडली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक चालक आयुब शेख (रा. शिवपुर ता. वैजापूर) हा रात्री औरंगाबाद येथून ट्रकमध्ये गॅसने भरलेल्या टाक्या घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाला होता. ही ट्रक वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील केनवड गाव परिसराच्या हद्दीत आली तेव्हा पहाटे चार वाजता अचानक काळवीटांचा कळप ट्रकला आडवा गेला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला लावलेले रक्षा कडे तोडून ट्रकची पलटी होऊन ती रस्त्याच्या कडेला पडला. यावेळी ट्रकमधील सर्व टाक्या खाली पडल्या होत्या.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मुख्य सुरक्षा रक्षक एस. एस. चिमुकले व सुरक्षा रक्षक गणेश सोनुने घटनास्थळी दाखल झाले.

समृद्धी महामार्गाच्या कडेला सुरक्षेसाठी जाड पत्र्याच्या प्लेट बसविण्यात आलेल्या आहेत. अपघात झाला त्या ठिकाणी मात्र अनेक प्लेटचे नट बोल्ट गायब होते. त्यामुळे ट्रक या प्लेट तोडून थेट खाली गेल्याचे चालक शेख यांनी सांगितले.

Web Title: Accident A truck carrying gas tanks overturned on Samriddhi Highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here