Home क्राईम संगमनेर: विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न, चौघांवर गुन्हा

संगमनेर: विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न, चौघांवर गुन्हा

Sangamner Crime: आई- वडिलांकडून पैसे आणावेत या मागणीसाठी गळ्यातील ओढणीने विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना.

Attempt to kill married woman, crime against four

संगमनेर: गाळा घेण्यासाठी आई- वडिलांकडून पैसे आणावेत या मागणीसाठी गळ्यातील ओढणीने विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील हाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, हाजीनगर परिसरात राहणाऱ्या सानिया नजर पठाण (वय १९) या विवाहितेने गाळा घेण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडून पैसे आणावेत, अशी मागणी तिा पती व घरच्या मंडळींनी केली. यासाठी त्यांनी सदर विवाहितेचा छळ केला. सासरच्या मंडळींकडून पैशासाठी केल्या जाणाऱ्या शारीरिक व मानसिक छळामध्ये वाढ होत राहिल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तिच्या पतीने तिला  पुन्हा नांदायला आणले. सासरी आल्यानंतर काही दिवसांनी तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. रविवारी रात्री तिला दीर आणि सासू-सासऱ्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गळ्यातील ओढणीचा फास देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तिला दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले.

पोलिसांनी तिचा जबाब घेतला याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पती नजर रियाज पठाण, दीर अजहर रियाज पठाण, सासरा रियाज ताजखान पठाण व सासू आरिफा रियाज पठाण (सर्व रा. हाजीनगर) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०७ सह हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचा पती नजर व दीर अजहर या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे करत आहेत.

Web Title: Attempt to kill married woman, crime against four

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here