Home Accident News ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू

ऊस तोड कामगारांचा ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, ३ महिलांसह २ मुलांचा मृत्यू

Tractor Accident: ऊस तोड मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात, ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट उजनी कालव्यात कोसळला. या अपघातात ३ महिला मजूर व २ मुलांचा मृत्यू झाला.

Accident tractor falls into canal, 3 women and 2 children killed

पंढरपूर: पंढरपुरातून अपघाताची एक भयंकर घटना घडली आहे. ऊस तोड मजूरांना ऊसाच्या फडात घेवून जात असताना एका ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट उजनी कालव्यात कोसळला. या अपघातात तीन ऊसतोड महिला मजूरांसह दोन‌ लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पंढरपूर जवळच्या करकंब परिसरात मंगळवारी रात्री (13 डिसेंबर) ११ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या मजुरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात जखमी तसेच मृत्युमुखी पडलेले ऊसतोड मजूर हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती आहे.

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त मजूर हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरने ऊसाच्या फडात जात होते. यावेळी ट्रॅक्टर करकंब परिसरात आले असता, चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. आणि ट्रॅक्टर थेट उजनी कालव्यात कोसळला. या भयंकर घटनेत तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे अपघातातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Accident tractor falls into canal, 3 women and 2 children killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here