Home अकोले निळवंडे गावात बिबट्याची दहशत, दिवसभर विद्यार्थी वर्गातच

निळवंडे गावात बिबट्याची दहशत, दिवसभर विद्यार्थी वर्गातच

Akole: बिबट्याची दहशत, दिवसभर विद्यार्थी वर्गातच : मैदानावर कुणी खेळायला सोडले नाही.

Bibatya terror in Nilwande village

अकोले : तालुक्यातील निळवंडे परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शनिवारी एका बिबट्याला कोकणेवाडी शिवारात जेरबंद करण्यात राजूर वन विभागाला यश आले; पण रविवारी सकाळी आठ वाजता निळवंडे प्राथमिक शाळेच्या आवारात बिबट्या बराच वेळ होता. पडक्या घराच्या आश्रयाने त्याने एक कोंबडी लंपास केली, तर सोमवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान गावातील मध्यवस्तीत घुसून सत्यवान गायकवाड यांच्या घराजवळून प्रदीप आभाळे यांची कोंबडी पळवली अन् प्रवरा नदीपात्राच्या झाडीत पसार झाला.

रविवारी सकाळी व सोमवारी सायंकाळी अनेकांनी हा बिबट पाहिला. प्रदीप आभाळे यांच्या शेळ्या, बकऱ्या बांधल्या होत्या. तेथे बिबट्या आला; पण बकऱ्या ओरडल्याने बिबट्याने कोंबडी घेऊन पोबारा केला. बिबट्याची दहशत वाढल्याने निळवंडे- निंब्रळ परिसरातील लोक सायंकाळी व पहाटे घराबाहेर पडत नाहीत. सोमवारी दिवसभर शाळेतील मुले वर्गातच बसून होती. मैदानावर कुणी गेले नाही. शाळा परिसरातील हिरवीगार झाडे छाटून टाकण्यात आली असून, विद्यार्थ्यांना पालकांनी आणून सोडावे व शाळा सुटल्यावर जबाबदारीने घेऊन जावे, एकट्या मुलास शाळेत पाठवू नये, असे पालकसभेत मुख्याध्यापिका रेखा लावरे यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू होताना व शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या आवाजात पाढे, कविता, इंग्रजी रॅम्स म्हणण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

निंब्रळ शिवारात रविवार सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका घरात बिबट्या घुसला होता. घरात आठ वर्षांचा मुलगा व त्याची आई होती, प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने बिबट पळाला, असे गावकऱ्यांनी सांगितल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी  बोलताना सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका, खात्री करून माहिती पसरवा, विठे घाटात वा अकोले वनक्षेत्र हद्दीत काळवीट नाही. बिबट आहेत, शेतात वावरताना काळजी घ्या, असे आवाहन साळवे यांनी केले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी निळवंडे प्राथमिक शाळेलगत बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

Web Title: Bibatya terror in Nilwande village

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here