Home महाराष्ट्र ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शाळांबाबत निर्णय  

ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शाळांबाबत निर्णय  

Varsha Gaikwad's decision regarding schools on Omicron background

संगमनेर | Omicron: ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने राज्यात आपले पाय रोवले आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील श्रीरामपूर येथे एक महिला ओमायक्रॉन बाधित आढळून आली आहे.  यामुळे प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. यातच नगर जिल्ह्यातील दोन शाळांमध्ये मिळून २७ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे

ओमिक्रॉनचाही प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाळांबाबत काय निर्णय घेण्यात येणार याबाबत खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

संगमनेरमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी वर्षा गायकवाड शनिवारी आल्या होत्या.

त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या  ‘गेल्या काही काळापासून शालेय विद्यार्थ्यांना करोनाची बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत, हे दिसून येत आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं बारकाईनं लक्ष आहे. मुळात शाळांसंबंधी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाच यासाठी पुरेशा आहेत. राज्यातील शाळांसंबंधी कोणताही निर्णय आता सरसकट घेतला जाणार नाही, तर स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

त्यामध्ये अतिशय बारकाईने विचार करण्यात आला असून कोणत्या परिस्थिती काय निर्णय घ्यायचे याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी स्थानिक पातळीवर परिस्थिती हाताळत आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू ठेवणे, बंद करणे किंवा आणखी काही उपाययोजना करणे याचे निर्णय घेतले जातील.

त्यामुळे यापुढे राज्य पातळीवरून सरसकट निर्णय घेतले जाणार नाहीत. त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही किंवा त्यांच्या आरोग्याशी तडजोडही केली जाणार नाही.

Web Title: Varsha Gaikwad’s decision regarding schools on Omicron background

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here