Accident: अज्ञात वाहनाच्या अपघातात दुचाकीवरील तरुण ठार
श्रीरामपूर | Accident | Shrirampur: तालुक्यातील खंडाळा येथील एका तरुणाचा श्रीरामपूर बाभळेश्वर रस्त्यावर प्रभात डेअरीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात धीरज मनोज बैसाणे रा. खंडाळा या तरुणाचा मृत्यू झाला.
गुरुवारी तरुण दुचाकीवरून श्रीरामपूरकडे खंडाळ्याच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. स्थानिक नागरिकांनी धीरज यास प्रथम श्रीरामपूर शहरात नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
Web Title: Shrirampur Young man killed in two-wheeler accident