Home अहमदनगर पत्नीला फारकत देणार, विवाहित पुरुषाचा महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार

पत्नीला फारकत देणार, विवाहित पुरुषाचा महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार

Ahmednagar Crime News married man abuses a college girl

अहमदनगर | Ahmednagar | Crime news: विवाहित पुरूषाने महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार (abuse) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापु बाबासाहेब मुठे (रा. भिंगार) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे. सदर तरुणी  22 वर्षीय असून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 23 डिसेंबर 2021 च्या रात्री नऊ ते 24 डिसेंबर 2021 च्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान देवगाव (ता. नगर) येथील रिसॉल्टवर ही घटना घडली.

बापु मुठे हा फिर्यादी तरुणीला म्हणाला,  माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु जर मला नकार दिला तर मी औषध घेवुन आत्महत्या करील, अशी धमकी दिल्याने फिर्यादी तरुणी बापु सोबत गेली. 23 डिसेंबर 2021 च्या रात्री देवगाव येथील रिसॉल्टवर बापुने फिर्यादी युवतीवर अत्याचार केला.

त्यानंतर फिर्यादी युवतीने तु माझ्यासोबत असे का केले, अशी विचारणा बापुकडे केली असता तो तिला म्हणाला, मी माझी पहिली पत्नी हिला फारकत देणार आहे व तुझ्यासोबत लग्न करणार आहे. घटना घडल्यानंतर पीडित युवतीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून बापु मुठे विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुठे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकतपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.

Web Title: Ahmednagar Crime News married man abuses a college girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here