Home महाराष्ट्र खर्चाची तजवीज न झाल्याने : मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी

खर्चाची तजवीज न झाल्याने : मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी

खर्चाची तजवीज न झाल्याने : मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी

वडवणी (बीड) : मराठा आरक्षणासाठी  जिल्हयात आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. तालुक्यातील  साळिंबा येथे एका महिलेने  वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे तिने बीडीएस अभ्याक्रमाला प्रवेश घेण्याचे ठरवले. मात्र, आरक्षणाअभावी या खर्चाची तजवीज न झाल्याने तिच्या आईने जाळुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २६) उघडकीस आली.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

सरस्वती अशोक जाधव (४०, रा. साळिंबा) असे मयत महिलेचे नाव आहे. जाधव कुटुंबीय मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवते. त्याची एकुलतली एक मुलगी शीतल ही बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आली होती. मात्र, आरक्षणाअभावी तिची शासकिय कोटयांतुन वैद्यकिय शिक्षणाची संधी  हुकली. खासगी महाविद्यालयांचे शुल्क आवाक्याबाहेर असल्याने कुटुंबीयांनी तिचा प्रवेश लातुर येथील बीडीएस अभ्यासक्रमासाठी खासगी महाविद्यालयात घेण्याचे निश्चित केले होते. तिला लातुरमध्ये शिक्षणासाठी ठेवले.  मात्र , परिस्थिती हालखीची असल्याचे तिचा शैक्षणिक खर्च जाधव कुटंबीय पेलवु शकत नव्हते. प्रवेशाची अंतिम तारीख १८ ऑगस्ट होती. प्रवेशासाठी पैसे नसल्याने तिची संधी हुकली. मुलीचे डॉक्टर मुलीला शिक्षणाला पैसे  नसल्याने तिची संधी हुकली. मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधूरे राहिल्याने तिची आई सरस्वती या निराश झाल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक मुलीला शिक्षणाला पैसे भरू शकलो नसल्याने त्यांनी 21 ऑगस्ट रोजी घरात कोणी नसताना सकाळी अंगावरुन रॉकेल ओतुन पेटवुन घेतले. यात त्या ८० % भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथुन त्यांनी  औरंगाबादेतील घाटीमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी साळिंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात  आले.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here