Home अकोले अकोले: विठे ठाकरवाडी येथून कामगार घेऊन जाणारी पिकअप पलटी -२५ जण जखमी

अकोले: विठे ठाकरवाडी येथून कामगार घेऊन जाणारी पिकअप पलटी -२५ जण जखमी

अकोले: विठे ठाकरवाडी येथून कामगार घेऊन जाणारी पिकअप पलटी -२५ जण जखमी

अकोले : आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कामगार घेऊन जाणारी पिक अप पलटी झाल्याची दुर्घटना घडली आहे. स्वाद हॉटेल जवळच्या वळणावर पीक अप गाडीने दोन पलट्या खाल्या सर्व प्रवासी गाडी बाहेर फेकले गेले. 

रुंभोडी शिवारात विठे घाटाच्या सुरुवातीला अकोले-राजूर रस्त्यावर स्वाद ढाब्याजवळच्या वळणावर पिक पलटी होऊन २२ ते २५ जण जखमी झाले.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date
सर्व अपघातग्रस्तांना अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना राजूरहून अकोले येथे उपचारासाठी नेण्यास आमदार वैभव पिचड यांनी मदत केली. रुग्णालयातही ते बराच वेळ थांबून जखमींच्या प्रकृतीची विचारसपूस करीत होते. विठे ठाकरवाडी येथून कामगार घेऊन पिकअप गाडी इंदोरीकडे येत होती. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here