अकोले: भंडारदरा निळवंडेतून सुटणार पिण्यासाठी पाणी
अकोले: प्रवरा नदीवरील नळ पाणीपुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी येत्या २ जूनपासून भंडारदरा प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. या काळात प्रवरा नदी काठावरील उपसा सिंचन योजनांचा विद्यत पुरवठा खंडित केला जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या मंजुरी व मार्गदर्शक सूचनेनुसार पाटबंधारे विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
अकोले संगमनेर राहता राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यातील सुमारे ७० ते ८० गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनानाचा उद्भव प्रवरा नदीवर आहे. मात्र प्रवरा नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सोसावा लागत आहे. हे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रवरा नदीमध्ये नळपाणी पुरवठा योजनाच्या साठी पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावर साधक बाधक विचार करीत पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या २ जूनपासून प्रवरा नदीपात्रात भंडारदरा निळवंडेतून पाणी सोडण्यात येणार आहे.
Website Title: Water for drinking water from Bhandardara Nilwande Dam