Home राष्ट्रीय अमित शहांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

अमित शहांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

नवी दिल्ली: नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आज राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याबाबत गुजरात राज्याचे भाजप अध्यक्ष जितु वघानी यांनी टविट करत अमित शहा यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे.

लोकसभा निवडणुकीत गुजरात मधील गांधीनगर मतदार संघातून अमित शहा निवडून आलेले आहेत. तेव्हापासून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नवीन सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमित शहा यांना नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार आहे. याबाबत गुजरात राज्याचे भाजप अध्यक्ष जितु वघानी यांनी टविट करत अमित शहा यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे.

अमित शहा यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्यांना भाजपाचे अध्यक्ष स्थान सोडावे लागणार आहे. कारण भाजपा एक व्यक्ती एक पद या सिद्धांतावर काम करीत आहे.

Website Title: Amit Shah in Modi’s Cabinet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here