अकोले: घरातील पाणी भरण्यासाठी विजेची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा झटका बसून तिचा म्रुत्यु झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कमानवेस परिसरात घडली.
सायरा अकबर शेख वय ३५ हि विवाहिता आपल्या घरी पाणी भरण्यासाठी मोटार सुरु करण्याच्या प्रयत्नात प्लगमध्ये पिन लावत असताना विजेचा शॉक बसून मरण पावली. या महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पण काहीही उपयोग झाला नाही. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सागर निपसे करत आहे. यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
Website Title: Akole Electricity and death of the woman