Home अकोले अकोले: झाडे तोडल्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून

अकोले: झाडे तोडल्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून

अकोले: सामायिक बांधावरील सागाची झाडे तोडल्याच्या कारणावरून निवृत्ती तुकाराम सूर्यवंशी वय ४८ यास लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना तालुक्यातील केळी रुम्हनवाडी येथे घडली आहे.

याबाबत अकोले पोलीस स्टेशनला मयताचा भाऊ कचरू तुकाराम सूर्यवंशी रा, सांगवी यांनी फिर्याद दिली असून यात म्हंटले आहे की, दिनांक २ जुन रोजी सकाळी १०:३० पूर्वी फिर्यादीचा मयत भाऊ निवृत्ती तुकाराम सूर्यवंशी याने आरोपी बाबुराव रघुनाथ सूर्यवंशी व गोपाल रघुनाथ सूर्यवंशी रा. सांगवी ता. अकोले यांच्या सामायिक बांधावरील सागाची झाडे तोडण्याच्या कारणावरून आरोपी यांनी संगनमत करून मयताच्या राहत्या घरी जाऊन मयत निवृत्ती सूर्यवंशी यास लाकडी दांडक्याने मारहाण करून जबर जखमी करून जीवे ठार मारले, मजकुराची फिर्याद दिल्याने अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हि घटना शनिवारी रात्री घडली असून रविवारी दुपारी याबाबत खबर मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी घटनास्थळी जाऊन सुरुवातीला अकस्मात दाखल करून आज सकाळी प्रवरा रुग्णालयात शवविचेद्न झाल्यानंतर फिर्यादीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुहील तपास पी एस आय विकास काळे करीत आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांचे पथक शोधासाठी रवाना झाले आहे. तालुक्यात खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. खून करणारे आरोपी हे मयताचे चुलत पुतणे असल्याचे समजते.    

Website Title: Akole Farmer’s Muder 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here