Weather Alert: या तारखेपासून हवामान होणार स्वच्छ: पंजाबराव डख
Weather Alert | श्रीगोंदा: ३ डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी पाउस पडण्याची शक्यता आहे. ४ डिसेंबरपासून हवामान स्वच्छ होणार आहे. तर ११ डिसेंबरपासून गुलाबी थंडीचा जोर वाढणार अशी माहिती हवामानतद्न्य पंजाबराव डख यांनी लोणी व्यंकनाथ येथे बोलताना दिली.
राजेंद्र काकडे यांच्या कृषी सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डख पुढे म्हणाले मला इयत्ता आठवीत असल्यापासूनच पावसाचा अंदाज सांगण्याचा छंद लागला आहे. सोशियल मेडियाच्या माध्यमातून रोज लाखो शेतकऱ्यांना हवामानसंदर्भात माहिती देत आहे. हे काम मी असेच सुरु ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
Web Title: Weather Alert about rain panjabrao dakh