Home संगमनेर संगमनेर: रोइंगपटू दत्तु भोकनळचे मंगळापुरात जल्लोषात स्वागत

संगमनेर: रोइंगपटू दत्तु भोकनळचे मंगळापुरात जल्लोषात स्वागत

रोइंगपटू दत्तु भोकनळचे मंगळापुरात जल्लोषात स्वागत

संगमनेर: आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयनमधी क्काडफ्ल स्कल्स सांघिक प्रकारात साथीदारांसमवेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या दत्तु भोकनळ याचे मंगळवारी संध्याकाळी संगमनेरात आगमन  झाले. मंगळापुर येथील त्यांच्या मुळगावातील ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. सजविलेल्चा वाहनातुन दत्तुला विराजमान करीत गावात सवाद्य विजयी मिरवणुक‍ काढण्यात आली.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

इंडोनेशियात आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील नौकानयनमधील क्काडफ्ल स्कल्स सांघिक प्रकारात साथीदारांसमवेत भारतीय नौकानयनपटुंनी सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या  दत्तु भोकनळ, स्वर्ण सिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह या चौकडीने भारताला नौकायनयतनात सुवर्णपदक मिळवुन दिले. इंडोनेशियाहुन दोन दिवसापुर्वी दत्तु भोकनळ पुण्यात दाखल झाला. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील त्याच्या मुळगावी मंगळापुर येथे त्याचे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी फटाक्यांची अतिषबाजी करीत त्याचे स्वागत केले. सजविलेल्या वाहनात दत्तुला विराजमान करीत मंगळापुर फाटयापासुन गावापर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यात  ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुक गावात आल्यानंतर विजयश्री मिळविणाऱ्या दत्तुचे महिलांनी औक्षण केले. ग्रामस्थंनी एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या दत्तु भोकनळचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here