Home संगमनेर संगमनेरला पाणीपुरवठा योजनांसाठी १२८ कोटी आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेरला पाणीपुरवठा योजनांसाठी १२८ कोटी आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेरला पाणीपुरवठा योजनांसाठी १२८ कोटी आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर: –  राज्याचे माजी महसुल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील ४० गावांसह ५९ वाडयावस्त्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणी पुरवठा योजनांसाठी सुमारे १२८ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल असल्याने वाडयावस्तीवर नागरीकांना नळांद्वारे घरात पाणी मिळणार आहे.

संगमनेर तालुका हा देवकौठे त बोटा असा विस्तीर्ण असून सर्वांत कमी पाऊस येथे पडतो. आ.बाळासाहेब थोरात यांच्यामुळे दुष्काळी ते विकसित तालुका अशी राज्यात संगमनेरची ओळख निर्माण झाली आहे. आ. थोरात यांनी कायम तालुक्याच्या व जिल्ह्याच्या पाणी प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. दुष्काळी भागात वरदान ठरणारे निळवंडे धरण पुर्ण करुन कालवे पुर्ण होण्यासाठी सातत्याने आग्रही भुमिका घेतली आहे. तळेगाव भागासाठी वरदान ठरणारी १६ गावची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक अडथळ्यांवर मात करुन कार्यान्वित ठेवली आहे. नव्याने तालुक्यातील ४० गावांमधून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व पाणी पुरवठा विभागाकडून ४४ योजनांसाठी १२८ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झालाआहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

यामध्ये देवकौठे, निमगाव भाजापूर, गुंजाळवाडी, चिकणी, सायखिंडी, वेल्हाळे, अंभोरे, वडगांव लांडगा, धांदरफळ बुद्रुक, जवहे कडलग,निमगांव बुद्रुक, निमगांव खुर्द, पेमगिरी, सावरचोळ, शिरसगांव धुपे, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, माळेगांव हवेली, तळेगांव दिघे, सुकेवाडी, खांजापूर, मालुंजे, हिवरगांव पावसा, ओझर खुर्द, पोखरी बाळेश्वर, वनकुटे, वरुडी पठार, सावरगांव घुले, महालवाडी, पिंपळगांव माथा, माळेगाव पठार, झरेकाठी, खळी, पानोडी, शिबलापूर, शेडगांव, जोर्वे, गोडसेवाडी, खंदरमाहवाडी, भोजदरी, डोळासणे, सारोळे पठार या गावांचा समावेश आहे. या योजनेमुळे तालुक्यातील वाडीवस्तीवरील नागरीकांना नळ योजनेचा लाभ मिळाणार आहे.

 राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय, जिल्हा परिषदकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पठार भागात प्रथमच अकरा गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असल्याने वाडयावस्त्यांवर नागरीकांना नळांद्वारे घरात पाणी मिळणार असल्याची माहिती जि.प.चे सभापती अजय फटांगरे यांनी दिली आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here