संगमनेर : घारगावमध्ये अज्ञात युवकाचा ट्रकखाली चिरडुन मृत्यु
घारगावमध्ये अज्ञात युवकाचा ट्रकखाली चिरडुन मृत्यु
संगमनेर : तालुक्यातील घारगाव येथील बसस्थानक परिसरात नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३५-४० वयाच्या अज्ञात युवकाचा पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज संध्याकाळी ८ च्या सुमारास घडली.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
नाशिक-पुणे राष्ट्रीय माहमार्गावरील घारगाव परिसरात रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात यापुर्वी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यु झाला होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतर महामार्ग प्रशासनाने घारगाव येथे दुभाजकावर लोखंडी जाळया लावल्या आहेत. बस स्थानक परिसरात नागरिकांसाठी भुयारी मार्ग आहे. मात्र या भुयारी मार्गात नेहमीच अस्वच्छता, घाण व अंधाराचे साम्राज्य असते.
त्यातील विजेचे बल्ब फुटल्याने किंवा चोरीला गेल्याने याचा फारसा वापर रात्रीच्या वेळी होत नाही. घारगाव बसस्थानक महामार्गाच्या दोन्ही बाजुने व्यापारी गाळे , बाजारपेठ असल्याने नागरिक जीवाची पर्वा न करता रस्ता ओलांडणाऱ्यांनी थांबविण्यासाठी दुभाजकावर लोखंडी जाळया लावण्यात आल्या आहेत. त्यातील फटीतुन अनेकजण अद्यापही रस्ता ओलांडतात. घारगाव बसस्थानक परिसरात असलेल्य उडडाणपुलामंळे या ठिकाणी पुण्याकडुन येणारी वाहने भरधाव वेगात येतात. या अपघातानंतर नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागवली मात्र अपघातातील मृत व्यक्ती पाहिल्याने त्यांनी नकार दिला . त्यामुळे खासगी रुग्णवाहीका बोलवण्यात आली तोपर्यंत सुमारे २५ मिनिटे मृतदेह तेथेच पडुन होता. या अपघातानंतर संगमनेरच्या दिशेने भरधाव जाणारा ट्रक (आर.जे.०२ जी.ए.८७१५) आंबी खालसा फाटयावर घारगाव पोलिसांना आढळला. चालक फरार झाला आहे. पोलिसांनी तो ट्रक घारगाव पोलिस ठाण्यात आणला आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.