Home अकोले अजित दादा की शरद पवार? अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदारांची काय आहे भूमिका?

अजित दादा की शरद पवार? अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आमदारांची काय आहे भूमिका?

Sharad Pawar: अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांची विरोधी भूमिका.

What is the role of NCP MLAs in Ahmednagar Sharad Pawar Or Ajit Pawar

Ajit Pawar: राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडली आहे. अजित पवारांनी बंड करून उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी नेते व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे.

आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप, आ. डॉ. किरण लहामटे हे नेते काल राजभवनात शपथ विधीला उपस्थित होते मात्र आज या नेत्यांनी आपण तटस्थ असल्याची भूमिका जाहीर केली आहे.

काल अजित पवारांसोबत शपथविधीला पारनेरचे आमदार निलेश लंके, अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप दिसून आले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आजोबा, शरद पवारांशेजारी बसून स्पष्ट संकेत दिले. सायंकाळी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, जे प्रदेशाध्यक्ष आणि फुटीनंतरही ज्येष्ठ पवारांसोबत ठाम उभे आहेत, त्या जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांचा कल शरद पवार गटाकडेच असल्याचे दिसून येत आहे. तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे खाजगी दौर्‍यानिमित्त परदेशात आहेत. त्यांचा कल स्पष्ट नाही. काही दिवसांत तो स्पष्ट होईल. मात्र दोन पवारांच्या राजकीय वर्चस्वाच्या खेळात जिल्ह्यात सर्वाधिक नेटवर्क असलेल्या या पक्षाची चाळण होण्याचे संकेत आहेत.

काल अजित पवार यांना पाठिंबा देणारे आमदार डॉ किरण लहामटे यांनी “मी जनतेबरोबर” असे सांगत आपल्या भूमिकेबद्दल ची संदिग्धता कायम ठेवली आहे. आ.डॉ. किरण लहामटे यांनी आज पिंपळगाव खांड धरणाच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना आपण जनतेबरोबर असे सांगत संभ्रमावस्था वाढविली आहे.

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्वीट केले आहे.

खा. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्वीट केले आहे. खा. अमोल कोल्हे हे काल शपथ विधीला उपस्थित होते, मात्र त्यांनी आज आपली भूमिका ट्वीट द्वारे जाहीर केली आहे.

Web Title: What is the role of NCP MLAs in Ahmednagar Sharad Pawar Or Ajit Pawar

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here