Home महाराष्ट्र Whether alert: राज्यात पुन्हा पाउस सुरु होणार

Whether alert: राज्यात पुन्हा पाउस सुरु होणार

Whether alert next four days rain in the state

मुंबई | Whether alert: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाउस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान नशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे बदललेले हवामान याचा एकत्रित परिणाम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर राहील. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसहित मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. असे वरिष्ठ शास्रज्ञ कृष्णानंद हौसाळीकर यांनी सांगितले आहे. नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

२० सप्टेंबर: पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया – यलो अलर्ट

२१ सप्टेंबर: पालघर,ठाणे,  नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली,, औरंगाबाद, जालना,  बीड, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, गोंदिया- यलो अलर्ट

२२ सप्टेंबर: पालघर, ठाणे, रायगड, पुणे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली- यलो अलर्ट

Web Title: Whether alert next four days rain in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here