अहमदनगर: विधवा महिलेवर अत्याचार व मारहाण, गर्भपात केला
Ahmednaagr News: लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर वारंवार अत्याचार (Rape) करुन तिला मारहाण तसेच तिचा गर्भपात केल्याची घटना.
श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर वारंवार अत्याचार करुन तिला मारहाण तसेच तिचा गर्भपात केल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी शहरातील सदर विधवा महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 2012 साली माझे पती मयत झाले. मला दोन मुली असून त्या सासू सासर्यांसोबत वर्धा जिल्ह्यात राहतात. 2017 मध्ये श्रीरामपूरला मामे भावाच्या लग्नाला आपण आलो असताना रोहित सौदागर (वय 40, रा. बजरंगनगर चौक, वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) याच्याशी ओळख झाली. त्याने फोनवर बोलून लग्नाची मागणी घातली. माझे पूर्वी लग्न झाले असून दोन मुली असल्याचे मी त्याला सांगितले तरीही त्याने लग्नाला तयारी दर्शविली.
त्यानंतर आमच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्याने मला भाडोत्री खोली घेवून दिली. रोहित आपल्याकडे यायचा व शरीर संबंधाची मागणी करायचा. नकार दिल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आहे काळजी करु नको असे म्हणायचा. तेव्हा आपण लग्नाचा आग्रह धरला असता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली व इच्छेविरुध्द शरीरसंबंध केले. तेव्हा रोहितचे एका महिलेशी यापूर्वी लग्न झाल्याचे समजले. मी गरोदर असल्याचे समजल्यानंतर त्याने गर्भपात करुन घ्यावा यासाठी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सोन्याचे दागिनेही काढून घेतले असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी रोहित सौदागर याच्याविरुध्द भादंवि कलम 323, 376 (2) (एन), 420, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास श्रीरामपूर पोलिस करीत आहे.
Web Title: widow woman was Rape and beaten, abortion was performed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App