Home क्राईम अनैतिक संबधास पतीचा अडथळा: पत्नीचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावले

अनैतिक संबधास पतीचा अडथळा: पत्नीचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावले

Murder Case:  अनैतिक संबधास पतीचा अडथळा ठरल्याने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

Wife Murder her husband as his immoral relationship becomes a hindrance

लातूर : अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच खून केल्याची घटना लातूर जिल्ह्यात समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळला. त्यानंतर कमरेला दगड बांधून पतीला पाण्यात फेकून दिलं. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील घडली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केला असता, हा मृतदेह देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर आलं आहे. अरविंद पिटले असं मृत व्यक्तीचं नाव होतं. अरविंद हे त्यांच्या पत्नीसह लातूर शहरातील ठाकरे चौकात वास्तव्यास होते.

ऐकेदिवशी अचानक अरविंद हे बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह (Dead body) कॅनॉलमध्ये आढळून आला. अरविंद हे बेपत्ता असूनही पत्नीने पोलिसांत तक्रार केली नव्हती. त्यामुळे पोलिसांना अरविंदच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आपणच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा (Murder) काढल्याची कबुली पत्नीने दिली.

मयत अरविंदच्या पत्नीने घरणी येथे राहणाऱ्या सुभाष शिंदे या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबधास अरविंद हा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून अरविंदचा काटा काढायचं ठरवलं. पत्नीने जेवायच्या निमित्ताने अरविंदला एका धाब्यावर नेलं. तिथे उपस्थित असलेल्या प्रियकर सुभाषच्या मदतीने तिने अरविंदचा गळा आवळला.

त्यानंतर एका पिशवीत दगड भरून ती मयताच्या कमरेला बांधून कॅनॉलच्या पाण्यात टाकला. या घाईगडबडीत मयत अरविंदचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे सोपे झाले. दरम्यान लातूर ग्रामीण पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिचा प्रियकर (Lover) सुभाष शिंदे यांना अटक (Arrested) केली आहे.

Web Title: Wife Murder her husband as his immoral relationship becomes a hindrance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here