Home अहमदनगर अहमदनगर: कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून पत्नीवरच केला सामूहिक अत्याचार

अहमदनगर: कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून पत्नीवरच केला सामूहिक अत्याचार

Ahmednagar News: कोल्ड्रिंक्सकमधून बळजबरीने दारू पाजून मित्राच्या सहाय्याने दोन वेळा सामुहिक अत्याचार (Gang Raped) केल्याची खळबळजनक घटना, पतीसह सासु, सासरा आणि वेटरवर गुन्हा दाखल.

wife was gang-raped by drinking alcohol from cold drinks

श्रीगोंदा | Shrigonda: जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन पत्नीला कोल्ड्रिंक्सकमधून बळजबरीने दारू पाजून मित्राच्या सहाय्याने दोन वेळा सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पतीसह त्याचा मित्र, अत्याचारित महिलेच्या सासु सासऱ्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अत्याचारित महिलेनी दिलेल्या फिर्यादी नुसार, फिर्यादी पीडित महिलेचे २०१४ साली श्रीगोंदा शहराजवळील एका गावातील तरुणाशी विवाह झाला होता. फिर्यादी महिलेला नीट काम येत नाही, माहेरवरून पैसे आणले नाहीत आदी कारणावरून पतीसह सासु सासरे वेळोवेळी छळ करत त्यामुळे या छळाला कंटाळून पीडित महिला आठ महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. मात्र काही दिवसापूर्वी पतीने पीडित महिलेला माघारी पुन्हा नांदवण्यास आणले आणि जेवणाच्या बहाण्याने श्रीगोंदा शहरातील एका हॉटेलवर नेले. तेथे गेल्यानंतर कोल्ड्रिंक्समध्ये दारू टाकून तीला ती बळजबरीने पाजली. त्यानंतर पीडितेच्या पतीचा याच हॉटेलमधील मित्र असलेल्या वेटरच्या सहाय्याने नशेत असलेल्या पत्नीवर बळजबरीने सामूहिक अत्याचार करत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. मात्र घडलेली घटना पीडित महिलेने तिच्या सासु सासऱ्याना सांगितली असता त्यांनी तिला ‘तुझा नवरा जे सांगेल, ते गुपचूप कर’ असे सांगत तिला शांत राहण्यास सांगितले. या घटनेनंतर पुन्हा काही दिवसांनी अत्याचारित महिलेला तिच्या पतीने पुन्हा बळजबरीने हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी घेऊन जात तिला पुन्हा कोल्ड्रिंक्समध्ये दारू टाकत बळजबरीने दारू पाजली आणि पुन्हा एकदा हॉटेल मधील मित्र असलेल्या वेटरच्या सहाय्याने नशेत असलेल्या पत्नीवर बळजबरीने अत्याचार करत, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तोच घडलेली घटना कोणाला सांगितली तर व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. अखेर या प्रकरणाने घाबरलेल्या महिलेने घडलेली गोष्ट माहेरी सांगत, या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती, सासु, सासरे आणि पतीचा मित्र असलेला हॉटेल मधील वेटर यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: wife was gang-raped by drinking alcohol from cold drinks

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here