Home अहमदनगर वाईन विक्री विरोधात अण्णा हजारे यांची या तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा

वाईन विक्री विरोधात अण्णा हजारे यांची या तारखेपासून आमरण उपोषणाची घोषणा

Wine Decision Anna Hazare announces fast till death from this date

Parner| Ahmednagar | पारनेर: राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन (Wine Sell) विक्री करण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला आहे. या निर्णयाला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातून याबाबत प्रतिक्रिया उमटत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare) यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता.

अखेर १४ फेब्रुवारीपासून त्यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अण्णांच्या या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समाजात चांगली पिढी निर्माण होण्याचे दृष्टीने हा निर्णय अण्णांनी घेतला आहे.

Web Title: Wine Decision Anna Hazare announces fast till death from this date

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here