Home अहमदनगर लग्न झालेले असताना तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष अत्याचार

लग्न झालेले असताना तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष अत्याचार

Ahmednagar Crime:  लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीवर गेली दोन वर्षे त्यांच्या जिममध्ये व पुणे येथे हॉटेलमध्ये नेवून अत्याचार (abused).

woman abused for two years by luring her into marriage

श्रीरामपूर:  लग्न झालेले असतानाही शहरातील एका तरुणीस फसवून लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीवर गेली दोन वर्षे त्यांच्या जिममध्ये व पुणे येथे हॉटेलमध्ये नेवून अत्याचार केला. लग्न करण्यास नकार देवून मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2020 पासून ते दि. 8 डिसेंबर 2022 पावेतो युवराज विजय शिंदे, रा. मेनरोड श्रीरामपूर याने त्याचे लग्न झालेले असताना देखील आपण लग्न करु, एकत्र राहु असे म्हणून तरुणीसोबत वेळोवेळी पुणे येथील हॉटेलवर तसेच त्याचे पुणे येथील फ्लॅटवर व त्याचे सुर्या जिममध्ये बळजबरीने शारिरीक संबध ठेवले. तसेच दत्त मंदिर येथे माझ्या केसात सिंदूर भरुन, गळ्यात मंगळसुत्र बांधुन, खोटे लग्न करुन तरुणीची फसवणूक केली आहे.

तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तरुणीस शिवीगाळ करून मारहाण केली. तुला व तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.तुझ्या सोबत लग्न करणार नाही. मी तुझ्याकडुन माझा फायदा करुन घेतला आहे, असे त्याने सांगितल्याने तरूणी तेथेच चक्कर येवुन पडली. त्यानंतर ती श्रीरामपूर येथे आल्यावर तिने वेळोवेळी फोन करुन आपण लग्न करु असा हट्ट धरला असता त्याने तरुणीला बदनामी करण्याची व मारण्याची धमकी देवुन तिचे फोन ब्लॉक करुन टाकले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

दि. 08 डिसेंबर 2022 रोजी युवराज शिंदे याचे घरी बाटाशोरुमच्या वरच्या मजल्यावर मेनरोड श्रीरामपूर येथे तरूणी गेली असता तेव्हा तेथे काम करणार्‍या एका मुलाकडुन समजले की युवराज याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहे. तेव्हा युवराज याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तरूणी बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरुन चढुन आत्महत्या करत असतांना तेथील नागरिकांनी तरूणीस पकडले. तेव्हा चक्कर येवुन ती खाली पडली असता उपचारासाठी तिला साखर कामगार हॉस्पीटल श्रीरामपूर येथे दाखल केले.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी युवराज विजय शिंदे याचेविरुद्ध भादंवि कलम 376, 420, 334, 504, 506 गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.

Web Title: woman abused for two years by luring her into marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here