Rain Alert: चक्रीवादळामुळे राज्यात तीन दिवस पावसाचे
Rain Alert: राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मॅन- दौस चक्रीवादळ आता विरळले असले तरी त्याच्या परिणामामुळे राज्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पावसाची शक्यता
११ डिसेंबर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर.
१२ डिसेंबर- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड, वर्धा, नागपूर, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर.
१३ डिंसेबर- रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, वेल्लोरजवळ तीव्र दाबाच्या क्षेत्रात नाशिक.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ तामिळनाडूतील रूपांतरित झाले. त्यानंतर त्याची तीव्रता आता कमी होत असून सध्या ते ताशी ९ किमी वेगाने नैर्ऋत्य दिशेने सरकत आहे. पुढील १२ तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होत जाणार आहे. यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांसह महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचे सावट असतानाच राज्यातील अनेक ठिकाणच्या ठिकाणी, तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान औरंगाबाद येथे ७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्यात बहुतांश मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे. पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका
समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Web Title: Three days of rain in the state due to cyclone