Home क्राईम संगमनेर: फरारी बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: फरारी बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner Crime:  गुंगारा देण्याऱ्या बोगस डॉक्टरच्या ९ महिन्यानंतर मुसक्या आवळण्यात आश्वी पोलीसाना यश आले आहे.

Crime has been registered against the fugitive bogus doctor

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे बोगस डॉ. असिम दास हा मंजुमाता दवाखाना चालवत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी यांनी ७ मार्च रोजी आश्वी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कोंडाजी मदने यांना दिले होते. त्यामुळे कारवाईच्या भीतीने पळून गेलेल्या बोगस डॉ. असिम दास यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसासह आरोग्य विभागाला गुंगारा देण्याऱ्या या बोगस डॉक्टरच्या ९ महिन्यानंतर मुसक्या आवळण्यात आश्वी पोलीसाना यश आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पानोडी येथे बोगस डॉ. असिम दास हा मंजुमाता नावाने मागील अनेक होता. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप याना मिळाल्यानंतर त्यांनी आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने याना याबाबत कारवाई करुन आवाहल सादर करण्याचे आदेश ७ मार्च २०२२ रोजी दिले होते. त्यामुळे डॉ. कोंडाजी मदने हे पानोडी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी अमोल उगलमुगले यांच्या समवेत पानोडी येथे दवाखाना असलेल्या ठिकाणी गेले होते. परंतु कारवाई होण्याच्या भीतीने आधीच बोगस डॉ. असिम दास याने घटनास्थळाहून पलायन केले होते. यावेळी डॉ. मदने याचा हा दवाखाना एका घरात असून त्यावर एक फलक लावलेला दिसला. त्या फलकावर मंजुमाता दवाखाना डॉ. असिम दास (निसर्गोपचार) तसेच विविध आजारांची नावे लिहिलेली दिवसापासून दवाखाना चालवत होती.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

याबाबत डॉ. मदने यानी मेडिकल कौंसिलकडे याबाबत चौकशी केली असता या व्यक्तीच्या नावे रजिस्ट्रेशन अथवा पदवी आढळून आली नाही. आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात या बोगस डॉक्टर विरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील ९ महिन्यापासून या बोगस डॉक्टरचा आश्वी पोलीस कसून शोध घेत होते. परंतू त्याचा काहीही थांगपत्ता पोलीसाना आढळून येत नव्हता. नुकतीचं पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना आरोपी असिम दास हा नगर येथील पारेगाव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

Web Title: Crime has been registered against the fugitive bogus doctor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here