Home अहमदनगर अहमदनगर: 10 वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर: 10 वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Ahmednagar News:  10 वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

Woman commits suicide by jumping into well with 10-year-old son

पाथर्डी | Pathardi:  पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे 10 वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.या घटनेत  मनीषा संदीप नरवडे (35) व ओमकार संदीप नरवडे (10, दोघे रा. गारूडकर वस्ती, तिसगाव, ता. पाथर्डी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

तिसगावमध्ये मुलासह महिलेने आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गारुडकर वस्ती जवळील विहिरीजवळ धाव घेतली. माय लेकराचा मृतदेह पाण्यात तरंगताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. नरवडे कुटुंबातील माय लेकरांनी आत्महत्या का केली याचे कारण जरी अद्याप अस्पष्ट असले तरी पाथर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मयत मनीषा नरवडे व ओमकार नरवडे यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह  शवविच्छेदनासाठी पाथर्डीला पाठविण्यात आले आहे.

Web Title: Woman commits suicide by jumping into well with 10-year-old son

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here