Home अकोले अकोले: अपूर्ण गर्भपात केल्याने महिलेचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल

अकोले: अपूर्ण गर्भपात केल्याने महिलेचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल

Akole | Rajur News:  गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना देखील निष्काळजीपणे  अपूर्ण गर्भपात करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना. (Ahmednagar)

Woman dies due to complete abortion, Crime registered

राजूर : गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना देखील निष्काळजीपणे  अपूर्ण गर्भपात करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या राजूर येथील डॉ. बी. टी. गोडगे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील शेनित येथील सीताबाई संदीप तळपे (वय २४) या महिलेचा ११ मार्च ते १२ मार्च सकाळी या काळात मृत्यू झाला होता. याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

मयत महिलेचा मृतदेह प्रवारानगर लोणी येथे विच्छेदनासाठी पाठवला होता. या विच्छेदन अहवालात मयत महिलेचा अर्धवट गर्भपात असे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद केले होते. त्यावरून नमूद आकस्मिक मृत्यूचा तपास करत असताना पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मत मागवले होते. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नेमलेल्या समितीने औषधोपचाराच्या कागदपत्रांची तपासणी करून गोडगे यांना गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे सांगत मयत तळपे हिच्यावर केलेले औषधोपचार योग्य नव्हते. त्यांनी वैद्यकीय गर्भपात अधिनियम (एम. पी. टी.) या कायद्याचा भंग केला, असा लेखी अभिप्राय देण्यात आला.

सदर अहवालानुसार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जे. एफ. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. बी.टी. गोडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Woman dies due to complete abortion, Crime registered

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here