लोणी: पिकअपच्या धडकेत महिला ठार
Ahmednagar News: पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोराची धडक (Accident) दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार. चालकावर गुन्हा दाखल.
राहता: राहाता येथून दुचाकीवर बाभळेश्वरकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मंगल इंद्रभान बेंद्रे (वय ५२) यांना जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
मंगल इंद्रभान बेंद्रे असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मंगल बेंद्रे या पुतण्या एकनाथ बाळासाहेब बेंद्रे यांच्यासोबत गुरुवारी (दि. २३) एमएच १७, एबी २२४७ या दुचाकीवर राहाता येथे दवाखान्यात गेल्या होत्या. पुन्हा राहात्याकडून बाभळेश्वरकडे घरी येताना दुपारी १२:३० ते १ वाजेदरम्यान हॉटेल बजरंगच्या बोर्डालगत शिर्डीकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने (एमपी.४६ जी.३०७७) दुचाकीस पाठीमागून धडक दिली. यात एकनाथ बेंद्रे बाजूला उडून पडले, तर मंगल बेंद्रे या पिकअपखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकनाथ बेंद्रे हे जखमी झाले.
याप्रकरणी मयत मंगल बेंद्रे यांचे पती इंद्रभान बादशहा बेंद्रे याच्या फिर्यादीवरून चालकाविरोधात लोणी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Woman killed in pick-up collision Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App