वेश्या व्यवसायावर छापा एकास अटक; दोन महिलांची सुटका
Pune Crime: वेश्या व्यवसायप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा (raid) टाकून एकाला अटक (Arrested).
आळंदी | पुणे: केळगाव (ता. खेड) येथे वेश्या व्यवसायप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा (raid) टाकून एकाला अटक केली असून, दोन पीडितांची सुटका केली आहे. गुरुवारी (दि. २३) आळंदीजवळील केळगाव हद्दीत ही घटना घडली आहे.
बसवराज सुबन्ना बिरादार (वय ३६, रा. केळगाव, आळंदी) असे अटक आरोपीचे नाव असून, आरोपीवर अनैतिक व्यापार अधिनियम १९५६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा त्याच्या आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून दोन पीडितांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून ७ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Web Title: One arrested in raid on prostitution business
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App