Home अकोले अकोलेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, घरांचे छप्पर उडाले, झाड अंगावर पडून शेतकरी...

अकोलेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, घरांचे छप्पर उडाले, झाड अंगावर पडून शेतकरी गंभीर जखमी

Ahmednagar | Akole rain: शेतकऱ्यांच्या घराचे छप्पर उडाले तसेच भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून गंभीर जखमी.

Heavy rains accompanied by strong winds in Akole, roofs of houses were blown

अकोले:  अकोले तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिरविरे, पाडोशी, वाखारी, चंदगीरवाडी, एकदरे, पिंपळदरावाडी, रामवाडी, जायनावाडी, इदेवाडी, बिताका, तिरडे, पाचपट्टा यांसह परिसरात वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वांचीच तारांबळ उडवून दिली. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घराचे छप्पर उडाले तसेच भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर शेतकऱ्याच्या अंगावर झाड पडून गंभीर जखमी झाले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसाने चांगलीच धांदल उडाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

चंदगीरवाडी परिसरात दत्तु नथू भांगरे यांच्या अंगावर झाड पडले असून ते गंभीर जखमी झाले आहे.त्यांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पीटल घोटी येथे नेण्यात आले आहे.

तसेच परिसरातील अशोक त्रिंबक शिंदे,इंदुबाई सुधाकर चौरे, बाळु काळु भांगरे,लहानु गोविंद भांगरे, साळुबाई भांगरे यांच्या राहत्या घरांचे छप्पर उडून संसार उपयोगि वस्तू, कपडे, धान्य यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने भातपिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

ग्रामीण भागात शेती कोरडवाहू आहे. भात हेच एकमेव पिक उदरनिर्वाहाचे साधन आहे. लेकराबाळांचे शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या जिवनावश्यक गरजांची पुर्तता, छोटेमोठे धार्मिक कार्यक्रम, नैसर्गिक, मानवनिर्मित संकटे यांवर होणारा खर्च त्यामुळे आधिच मेटाकुटीला आलेला शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे .तोंडापासी आलेला हक्काचा घास नैसर्गिक संकटामुळे ओढून नेला आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची वेळ आहे. नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी शेतकरी वर्गाकडून मागणी जोर धरत आहे.

Web Title: Heavy rains accompanied by strong winds in Akole, roofs of houses were blown

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here