Home क्राईम संगमनेर : महिला सरपंचाच्या पतीला मारहाण, चाकू, रॉडने हल्ला

संगमनेर : महिला सरपंचाच्या पतीला मारहाण, चाकू, रॉडने हल्ला

Sangamner Crime: महिला सरपंच यांच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना.

Woman sarpanch's husband beaten Crime Filed

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावातील महिला सरपंच यांच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पेमगिरी गावच्या महिला सरपंच द्वारका डुबे यांचे पती ज्ञानेश्वर पंढरीनाथ डुबे यांना रविवारी (दि. ३) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील भूमी अभिलेख कार्यालयासमोर पाच जणांनी बेदम मारहाण केली. यात डुबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश गडकरी, पंकज सोनवणे व तीन अनोळखी इसम (नाव, पत्ता माहीत नाही) अशा एकूण पाच जणांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर डुबे यांनी फिर्याद केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मारहाणीत चाकू आणि रॉडचा वापर करण्यात आला. डुबे यांच्या पाठीत, डोक्यात, उजव्या डोळ्याखाली आणि डाव्या हाताच्या मनगटावर मारहाण करण्यात आली. आहेत. चाकूने डोक्यात मारले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसा निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी पुढील तपास करीत आहे.

Web Title: Woman sarpanch’s husband beaten Crime Filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here