Home क्राईम पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या महिलेने केले अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या महिलेने केले अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

Woman sexually abuses minor child

अकोला | Akola Crime News: अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. एका महिलेवर अल्पवयीन मुलाचे शोषण (Sexually abuses) केल्याचे आरोप करण्यात आले आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

एक २९ वर्षीय महिला ही आपल्या पतीपासून विभक्त राहते. एका दालमिलमध्ये ती कामाला जात असते. तिच्याजवळ तिच्या बहिणीची मुलगी राहते. आरोपी महिला जिथे कामाला जाते तिथे एका १७ वर्षीय मुलासोबत ओळख वाढली. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. ३१ जानेवारीला सदर महिला बहिणीच्या मुलीला सोडून बेपत्ता झाली. लहान मुलगी रडत होती. परिसरातील नागरिकांनी महिलेचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. महिला बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळविल्यानंतर एक अल्पवयीन मुलगाही बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र ९ फेब्रुवारी रोजी हा अल्पवयीन मुलगा अचानक घरी परतला. आणि पोलिसांनी चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे ऐकून सर्वच हैराण झाले.

Web Title: Woman sexually abuses minor child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here