Home अहमदनगर Suicide: कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Suicide: कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Shevgaon Young farmer commits suicide due to indebtedness

Shevgaon | शेवगाव: तालुक्यातील सौंदाळा येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. संतोष शिवाजी आरगडे (वय 45 वर्षे) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

संतोष आरगडे यांना शेती उत्पन्नात होत असलेला सततचा तोटा, सहकारी सोसायटी, पतसंस्थाचे कर्ज  यांचा वाढता बोजा यामधून आलेल्या नैराशेतून त्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी शेवगावमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केला.

त्याच्यावर शेवगाव  येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र शनिवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू  झाला. असल्याची माहिती त्याचे कुटुंबातील व्यक्तींनी दिली. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Web Title: Shevgaon Young farmer commits suicide due to indebtedness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here