Home Accident News ब्रेकिंग: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात

ब्रेकिंग: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात

Accident Opposition leader Praveen Darekar's car crashed

मुंबई | Accident:  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ ही घटना घडली. या महिनाभरात दरेकरांच्या गाडीला तीनदा अपघात झाला आहे. हे तीनही अपघात एकसारखे मोटारसायकलस्वार अचानक पुढे आल्याने अपघात घडले आहेत. असे प्रवीण दरेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

याबाबत माझ्या मनात संशय निर्माण झाला असून मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे दरेकरांनी सांगितले. तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मला राज्यभर फिरावं लागतं. परंतु अशा पध्दतीने अपघात होत असल्याने मनात शंका आहे. तिन्हीवेळा गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. पंधरा दिवसांपासून ही अपघाताची मालिका सुरू असून आजचा हा प्रकार तिस-यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले.

आज कामानिमित्त प्रवीण दरेकर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळून जात असताना त्यांच्या समोरून अचानक एक मोटारसायकल स्वार आल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक लोक गाडीत होती. त्यामुळे सहका-यांना काहीतरी घातपाताचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्याची चौकशी करायला सांगणार आहे.

Web Title: Accident Opposition leader Praveen Darekar’s car crashed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here