Home क्राईम संगमनेर: बसमध्ये चढत असताना महिलेचे तीन तोळ्याचे दागिने लंपास

संगमनेर: बसमध्ये चढत असताना महिलेचे तीन तोळ्याचे दागिने लंपास

Sanganmner Crime News: महिला बसमध्ये चढत असताना महिलेचे तीन तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास (Theft) केल्याची घटना.

Woman's jewelry worth three tolas Theft while boarding a bus

संगमनेर: शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. एकदा अज्ञात चोरट्याने सोनसाखळी चोरण्याचा प्रकार संगमनेर बस स्थानकात केला आहे. एक महिला बसमध्ये चढत असताना महिलेचे तीन तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.  

याबाबत रामदास पाराजी खेमनर (राहणार जनता नगर, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे.  संगमनेर बस स्थानकात पाकीट मारी, सोनसाखळ्याची चोरी, पर्स चोरी असे प्रकार सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच बसमध्ये चढत असताना एका महिलेचे तीन तोळ्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते त्यानंतर लगेचच पुन्हा पाठोपाठ सोन्याची साखळी चोरण्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार खाडे हे घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Woman’s jewelry worth three tolas Theft while boarding a bus

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here