अकोले: अतिदुर्गम मवेशी आश्रमशाळेत अटल आरोग्य वाहिनीचे आद्यवत पूजन
अकोले प्रतिनिधी बाळासाहेब कानवडे :चालू अतिदुर्गम मवेशी आश्रमशाळेत अटल आरोग्य वाहिनीचे आद्यवत पूजन राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात आलेल्या आरोग्य वाहिनी कायापलट अभियानांतर्गत अतिदुर्गम मवेशी तालुका अकोले आश्रमशाळेत अटल आरोग्य वाहिनीचे अद्ययावत पूजन करून राजूर प्रकल्प समितीच्या अध्यक्ष सूनिताताई भांगरे,राजुर प्रकल्पाधिकारी संतोषी ठुबे,जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लांडे, बीव्हीजी चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंक्राळे, उपसभापती मारुती मेंगाळ, पंचायत समिती सदस्य अलकाताई अवसरकर, डॉक्टर रवींद्र गोरडे,डॉक्टर उमेश साने,श्रीकृष्ण चंदनकर, अमोल वाकचौरे,सौ.वर्षा वाणी, डॉक्टर प्रिया कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
राज्यासह जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होऊन ते उपचारापासून वंचित राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दुर्गम भागातील 301 आश्रम शाळा, 8 एकलव्य आदर्श शाळा यांना याचा प्रमुख्याने लाभ होणार आहे. यासाठी महाराष्ट्रात 48 नाशिक विभागात 26 अटल आरोग्य वाहिनी सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यातील राजुर प्रकल्पाअंतर्गत 3 अटल वाहिनी मवेशी येथील आश्रम शाळेत दाखल झाल्या आहेत. बहुदा आश्रम शाळा या दुर्गम,अतिदुर्गम व डोंगराळ भागात असल्यामुळे सर्पदंश व विंचूदंश लागणारे अँन्टीव्हेनस हे इंजेक्शनही या रुग्णवाहिकेत असणार आहे.
आपत्कालीन परिस्थिती तातडीने उपचार मिळावेत याचीही व्यवस्था या रुग्णवाहिकेमध्ये करण्यात आली आहे आदिवासी भागात जनजागृती होण्यासाठी आश्रमशाळेत आरोग्य समितीची स्थापना करण्यात येणार आहे यामध्ये पालक, शिक्षक,विद्यार्थी,डॉक्टर यांचा समावेश असेल ए आर ए आय. प्रमाणित बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तातडीची वैद्यकीय सेवा रुग्णवाहिकेच्या समन्वयासाठी इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर,विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, हेल्थ मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन सिस्टीम,च्या माध्यमातून प्रकल्प स्थितीचा आढावा, मोबाईल माध्यमातून डिजिटल हेल्थ कार्ड,उपचार समक्ष मिळणार आहेत थोडक्यात दुर्गम भागासाठी ही योजना उपयुक्त आहे.
Website Title: worship of the Atal Arogya Vahini in Maveshi Asharam school
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा