Home अकोले युवा स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातुन जनतेच्या अडचणी सोडवणार- महेश नवले

युवा स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातुन जनतेच्या अडचणी सोडवणार- महेश नवले

युवा स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातुन जनतेच्या अडचणी सोडवणार- महेश नवले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाखारी येथे शालेय साहित्याचे वाटप.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे.घेता घेता एकदिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हि वृत्ती उराशी बाळगुन तळागाळातील जनतेचे असणारे सामाजीक प्रश्न युवा स्वाभिमान या सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन सोडवणार असल्याचे आश्वासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अकोले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी दिले.
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या पाडोशी ( वाखरी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना वर्षभर पुरेल इतक्या शालेय साहित्याचे वाटप युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी महेश नवले प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावरून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ढवळा साबळे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती निमित्त प्रतिमा पुजनाने करण्यात आली.
यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश तोरमल, उपाध्यक्ष निलेश तळेकर, मुख्य संघटक सुरेश नवले, रविंद्र नवले, राजेंद्र कुमकर, अनिल कोळपकर, किरण चौधरी, श्रीकांत चौधरी,अमोल पवार, महेश ढगे, बाबासाहेब नाईकवाडी, युवा नेते संदिप दराडे, सुभाष मालुंजकर, पत्रकार शुभम फापाळे यांसह शाळेचे मुख्याध्यापक बहिरू साबळे,सह शिक्षक अनिल गुंजाळ तसेच बाळासाहेब साबळे, पुणाजी साबळे, सोमनाथ साबळे, बाळु नाडेकर, संतोष निकाळे, उत्तम साबळे, योगेश लेंडे, संतोष साबळे, सचिन साबळे, नाथु गोडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाखारी येथील अडीअडचणी शासन स्तरावर न सोडवल्यास संघटनेचे सर्व सदस्य श्रमदानातुन प्रश्न मार्गी लावतील असेही संघटनेच्या सदस्यांनी आपल्या मनोगतातून मत व्यक्त केले.
तसेच प्रवासादरम्यान संघटनेच्या सर्व सदस्यांनी अकोले तालुक्याच्या सिडमदर म्हणून ओळखल्या गेलेल्या कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे यांचा त्यांच्या राहात्या घरी जाऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन लगड यांनी तर आभार प्रदर्षण सुनिल लोखंडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाखारी येथील जिल्हा परिषद शाळा, सिद्धी विनायक तरूण मित्रमंडळ तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Website Title:akole solve the problems of the people through the medium of yuva swabhiman organisation


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here