Home अकोले अकोले नगरपंचायतने जी करांमध्ये वाढ केली आहे ती रद्द करण्यात यावी

अकोले नगरपंचायतने जी करांमध्ये वाढ केली आहे ती रद्द करण्यात यावी

अकोले नगरपंचायतने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी विविध करांमध्ये वाढ केलेली आहे.

अकोले नगरपंचायत ने यावर्षी युजर चार्जेस या नावाने प्रथमच कर आकारणी सुरु केलेली असून प्रत्येक घर,व्यवसायामागे प्रत्येकी रु.३००/- ते रु. ६००/- प्रमाणे आकारणी केलेली आहे,घरपट्टीपेक्षा युजर चार्जेस आकारणी जास्त आहे म्हणजेच “चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ” अशी गत झालेली आहे
त्याचप्रमाणे नगरपंचायतकडून नागरिकांना जे विविध दाखले दिले जातात, त्या दाखला फी पोटी मोठी रक्कम आकारली जाते
नगरपंचायत च्या सर्व १७ प्रभागांचा विचार करता काही भागांमध्ये स्ट्रीट लाईट,गटारी,रस्ते नाहीत,नगरपंचायतची स्वतःची शाळा,दवाखाना नाही,अग्निशमन वाहन नाही तरी सुध्दा कर आकारणी मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामुळे अकोलेतील नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली असून पूर्वीची ग्रामपंचायत बरी होती अशी म्हणण्याची वेळ आली आहे
 वरील प्रमाणे अकोले नगरपंचायतने जी करांमध्ये वाढ केली आहे ती रद्द करण्यात यावी म्हणून अकोलेकरांचे वतीने श्री गणेश कानवडे, श्री रामदास शेटे,बाबासाहेब नाईकवाडी,  सचिन शिंदे, अनिल शेटे,संतोष देठे,सुनिल शेणकर अनिल नाईकवाडी यांनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ संगिता शेटे व मुख्याधिकारी श्री निकम साहेब यांना निवेदन देण्यात आले व विविध करांमध्ये जी वाढ केलेली आहे ती रद्द करण्यात यावी, अन्यथा अकोलेतील नागरिक कोणत्याही प्रकारचे कर भरणार नाही व सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हणण्यात आले आहे.

Website Title: Akole Nagar Panchayat increased taxes


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here