Home अहमदनगर अहमदनगर: चॉकलेटचे आमिष दाखवत तुम्ही मला आवडता म्हणत……..तरुणावर गुन्हा

अहमदनगर: चॉकलेटचे आमिष दाखवत तुम्ही मला आवडता म्हणत……..तरुणावर गुन्हा

Ahmednagar | Kopargaon News: 11 व 13 वर्षीय दोन शाळकरी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत तुम्ही मला आवडता, म्हणत त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा.

You say you love me while luring me with chocolate crime against youth

कोपरगाव : 11 व 13 वर्षीय दोन शाळकरी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत तुम्ही मला आवडता, म्हणत त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणतांबा फाटा परिसरातील दोन अल्पवयीन मुली कोपरगाव शहरातील कन्या विद्यामंदिर शाळेत शिक्षणासाठी येतात. दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्या घरातून शाळेला जाण्यासाठी निघाल्या. पुणतांबा फाटा येथून त्यांच्या मागे अमोल बापू मोरे (वय २८, रा. शंकरनगर, कोपरगाव) हा लागला. घरापासून ते शाळेपर्यंत त्यांचा पाठलाग करीत असताना हातवारे करून मुलींना खुणवायचा. शाळा जवळ आल्यावर त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून तुम्ही मला आवडता, असे म्हणत राहिला. शाळेच्या गेटमध्ये तो घुसला होता. यापूर्वी २१ नोव्हेंबरलाही त्याने असाच प्रकार केला होता. सदर प्रकार मुलींनी आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर शुक्रवारी मुलीच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अमोल मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश येसेकर करीत आहेत. या घटनेने परिसरातील पालक भयभीत झाले संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: You say you love me while luring me with chocolate crime against youth

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here