Home अहमदनगर अहमदनगर: भाजप पदाधिकारी, ठेकेदारावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल

अहमदनगर: भाजप पदाधिकारी, ठेकेदारावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल

Ahmednagar News: भाजप पदाधिकारी, त्यांचा शासकीय ठेकेदार असलेला भाऊ यांच्या विरोधात वाळू चोरी प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

Sand theft case registered against BJP office bearer

अहमदनगर: भाजप पदाधिकारी, त्यांचा शासकीय ठेकेदार असलेला भाऊ यांच्या विरोधात वाळू चोरी प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन मंडळाधिकाऱ्यांनी शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी गावच्या सरपंचांच्या ताब्यात हा वाळू साठा दिला होता. तो वाळूसाठा मुंडे बंधूनी चोरी केल्याचा सरपंचांचा आरोप आहे.

४० ब्रास साठ्यापैकी पंधरा हजार रुपये किमतीचा एकूण २५ ब्रास वाळूसाठा २३ ते २४ ऑगस्टच्या दरम्यान चोरीला गेला आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्यावर शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी आणलेला वाळूसाठा चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंगेवाडीच्या सरपंच रंजना तानवडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंगेवाडी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सिमेंट कॉक्रींट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत होते. या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तहसीलदार व मंडल अधिकारी यांच्या परवानगीने 5 जून 2023 रोजी 30 ब्रास वाळू उपलब्ध करण्यात आली होती. ही वाळू येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठेवण्यात आली होती. पंरतु कंत्राटदार उदय मुंढे व अरूण भाऊसाहेब मुंढे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी रात्री जेसीबी व ट्रकमधून चोरून नेला. याबाबत सरपंच रंजना तानवडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मात्र, राजकीय दबावापोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने सरपंच रानवडे यांनी उच्च न्यायायाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिक दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने तहसीलदारांना व पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.24) शेवगाव पोलीस ठाण्यात मुंगी येथील मंडल अधिकारी अय्या फुलमाळी यांच्या तक्रारीनुसार अरूण मंढे व उदय मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sand theft case registered against BJP office bearer

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here