Home नांदेड प्रेमावर विश्वास मात्र डॉक्टर तरुणीने पाच इंजेक्शन घेऊन संपविले जीवन

प्रेमावर विश्वास मात्र डॉक्टर तरुणीने पाच इंजेक्शन घेऊन संपविले जीवन

Nanded Suicide News: लग्नाच्या पाच महिन्यानंतरच तिने पाच इंजेक्शनद्वारे इन्सूलिन घेऊन आत्महत्या.

young doctor took five injections and Suicide her

नांदेड:  प्रेमावर विश्वास ठेऊन गरीब घरातून येऊन बीएचएमएसचे शिक्षण घेतलेल्या तरुणीने कंपनीत कामाला असलेल्या तरुणासोबत लग्न केले. शिक्षणाची अट सोडून कुटूंबाचा विरोध पत्करून संसार सुरू केला.

मात्र, लग्न झाल्याच्या पाचच महिन्यात तिचा विश्वासघात झाला. प्रियकराने पती होताच दारू पिऊन बेदम मारहाण सुरू केली. सासू सासऱ्यांनी नातेवाइकांसमोर अपमान सुरू केला. सतत फारकतीची मागणी केल्याने डॉक्टर तरुणी तणावाखाली गेली. अखेर लग्नाच्या पाच महिन्यानंतरच तिने पाच इंजेक्शनद्वारे इन्सूलिन घेऊन जीवन संपविले.

आत्महत्येच्या आदल्या दिवशीच लग्नानंतर संपर्क तुटलेल्या मोठ्या बहिणीला कॉल करून तिने आपबिती सांगितली. त्यानंतर पाच दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना तिचा मृत्यू झाला. वर्षा अंबादास व्यवहारे (२४) असे तिचे नाव आहे.. सातारा पोलिस रात्री उशीरापर्यंत पती धनंजय डोंगरे (२५, रा. सावरगाव पोखरी, गेवराई) याचा व त्याच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. बीडच्या चक्रधरनगरमध्ये राहणाऱ्या वर्षांचे वडील अंबादास व मोठा भाऊ शाम यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. मोठी बहिण विवाहित असून बीडलाच राहते. वर्षाला डॉक्टर व्हायचे होते.

Web Title: young doctor took five injections and Suicide her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here