Home महाराष्ट्र कॉफीत गुंगीचे औषध टाकून तरुणाने महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल, केली शरीर...

कॉफीत गुंगीचे औषध टाकून तरुणाने महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल, केली शरीर सुखाची मागणी

Mangaon News: महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल,  शरीर सुखाची मागणी (obscene photos).

young man blackmails a woman by taking obscene photos 

माणगाव: रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉफीत गुंगीचे औषध टाकून तरुणाने महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत शरीरसुखाची मागणी एका नराधमाने केली होती.

अश्लील फोटो नातेवाईकांकडे आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी कोमटेक एजन्सीच्या गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने दिली होती. अनंत बासू मातारी असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की.  आरोपी अनंत बासू हा आसाम येथील मूळ रहिवासी आहे.  २०१५ पासून बासूने पीडित महिलेला मानसिक त्रास दिला. बासूच्या जाचाला कंटाळून पीडित महिलेने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. त्यानंतरही बासू पीडितेला त्रास देऊन ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर आरोपी बासूने पीडितेकडून ६ लाख ७० हजार रुपये उकळले. इतकच नव्हे तर पीडितेकडे आणि तिच्या मुलीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडितेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: young man blackmails a woman by taking obscene photos 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here