Home Suicide News सोशियल मेडीयावर व्हिडियो टाकून तरुणाची आत्महत्या, वरिष्ठ सहकाऱ्यांवर गुन्हा

सोशियल मेडीयावर व्हिडियो टाकून तरुणाची आत्महत्या, वरिष्ठ सहकाऱ्यांवर गुन्हा

Young man commits suicide by posting video on social media

अहमदनगर | Suicide: वरिष्ठ सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनई येथील मुळा एजुकेशन सोसायटीत क्लार्क पदावर काम करत असलेल्या तरुणाने त्रासाला कंटाळून नगर औरंगाबाद रोडवर वांबोरी फाट्याजवळ शुक्रवारी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

प्रतिक बाळासाहेब काळे वय २७ रा. तेलकुडगाव ता. नेवासा असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्यापूर्वी प्रतिक काळे याने शुक्रवारी ८ वाजून ४६ मिनिटांनी त्याचा लहान भाऊ अक्षय यास सोशियल मेडीयावर व्हिडियो टाकत सात जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तत्काळ ही बाब पोलिसांना सांगण्यात आली. त्यांनतर नेवासा पोलीस वा काळे कुटुंबीयांनी प्रतिक याचा शोध सुरु केला रात्री ११ वाजेच्या सुमारास झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रतिक आढळून आला. या घटनेनंतर प्रतिक याची एक क्लीप सोशियल मेडीयावर व्हायरल झाली असून त्यात त्याने ज्यांनी त्रास दिला आहे त्यांच्या नावांचा उल्लेख केला.

 याप्रकरणी बहिण प्रतीक्षा काळे हिने प्रतिक नोकरीस असलेल्या एका बड्या संस्थेशी निगडित सात जणांविरोधात प्रतिकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार एमआयडी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दामोदर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याण औटी, रावसाहेब भीमराव शेळके आणि रितेश बबन टेमक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून हे सर्व एका संस्थेशी निगडीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.   

Web Title: Young man commits suicide by posting video on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here