Home अहमदनगर लिंबाच्या बागेत गांजाची झाडे, नऊ लाखांचा गांजा जप्त

लिंबाच्या बागेत गांजाची झाडे, नऊ लाखांचा गांजा जप्त

Ahmednagar Cannabis plants in a lemon orchard

श्रीगोंदा | Ahmednagar: श्रीगोंदा तालुक्यात धककादायक बाब समोर आली आहे. चक्क लिंबाच्या बागेत गांजाची शेती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका शेतात तब्बल ८ लाख ९५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी अरुण हरिभाऊ जगताप व बाळू हरिभाऊ जगताप यांना ताब्यात घेतले आहे.  उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती दत्तवाडी लोखंडेवाडी दरम्यान गट नंबर ७००, ७०१ यामध्ये लिंबोणीच्या झाडातच गांजाची लागवड केली आहे.

ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथक हे श्रीगोंदा शिवारातील या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी लिंबोणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठी झाडांची लागवड केलेली होती.

Web Title: Ahmednagar Cannabis plants in a lemon orchard

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here